चाकूने वार करत चौकडीने तरुणाला लुबाडले
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्थानकच्या सात नंबर फलाटा जवळ रेल्वे डीझेल लोको शेड नजीक असलेल्या निर्जन स्थळी चोरटे रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत लुबाडत असल्याच्या अनेक घटना या पूर्वी घडल्या आहेत अशी एक घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे .डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली गाव येथे राहणारा मोहम्मद हुसेन २७ हा तरूण कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्थानकच्या सात नंबर फलाटा जवळ रेल्वे डीझेल लोको शेड नजीक असलेल्या रस्त्या वरून जात होता यावेळी १५ ते २० वयोगटातील चार मुलांनी त्याला अडवले तुझा मोबाईल आणि पैसे दे अन्यथा मारू अशी धमकी दिली मात्र मोहम्मद ने विरोध केला असता या चार जना मधील एकाने मोहम्मद च्या मांडीवर चाकूने वार करत त्याला जखमी करत त्याच्या जवळील मोबाईल व रोकड हिसकावून पळ काढला .या प्रकरणी मोहम्मद याने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात १५ ते २० वयोगटातील चार मुलां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.