चाकूने भोसकून इसमाला ३ लाखांना लुबाडले
(श्रीराम कांदु )
डोंबिवली : कल्याण पूर्व कोलशेवाडी परिसरात भुरट्या चोरट्याचा वावर वाढला असून लुटी च्या वाढत्या घटना मुले नागरिकांमध्ये दहशतीचे वातावारण आहे हे चोरते नागरिकांना एकटे गाठत त्यांचे लक्ष विचलित करत त्याच्या जवळील ऐवज लंपास करत आहेत .मात्र हि वाढती गुन्हेगारी रोखण्यात कोल्शेवादी पोलिसांना अपयश आल्याचे वाढत्या घटना वरून दिसून येत आहे .कल्याण पूर्व तिसगाव परिसरात बालाजी अपार्टमेंट मध्ये राहणारे वारिजा कोटियन हे काल दुपारी पुना लिंक रोड ने जात होते यावेळी पावूस आल्याने त्यांनी आडोशाचा आसरा घेतला हि संधी साधत दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले त्यांनी ज्ब्र्दास्तीने त्याच्या जवळील ३ लाख १ हजार रोकड व एक मोबाईल असलेली पिशवी हिसकावली यावेळी कोटियन यांनी विरोधात करण्याचा प्रयत्न केला असता या दोघा मधील एकाने कोटियन यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना जखमी करत या दोघा अज्ञात इसमांनी तेथून पळ काढला या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलीसा इ अज्ञात इसम विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे