चलानातुन बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नोटा हस्तगत
ठाणे-चलानातुन बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी पकडल्या आहेत.वागळे इस्टेट पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.
एक इसम चलानातुन बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेउन लाल बहादुर शास्त्री मार्ग येथे येणार असल्याची खबर वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांना मिळाली होती.त्याप्रमाणे या विभागात सापळा रचून पोलिसांनी एकाला चलानातुन बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नोटांसहित अटक केली.
Please follow and like us: