चरू बामा म्हात्रे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश ; कोपर गावात काढली जनजागृती रॅली
डोंबिवली – आपला देश, राज्य, जिल्हा, शहर आणि गाव स्वच्छ करण्यासाठी आता विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. कोपर गावातील ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ ( संचालित ) सरकार मान्य चरू बामा म्हात्रे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला.या विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देणारे चित्रे काढली.या रॅली अध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ओला कचरा – सुका कचरा यांचे वर्गीकरण करावे, रस्त्यावर कचरा टाकू नका, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका.. रस्त्यावर थुंकू नका असे सांगत शाळेपासून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत ग्लोबल महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.कोपर गाव येथील चरू बामा म्हात्रे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी जनजागृती रॅली काढली होती. प्लास्टिक पिश्व्यामुळे पर्यावरणाची हानी होत असते.म्हणून कागदी आणि कापडी पिशवी वापर केला पाहिजे. पालिकेने रुजवू संस्कृती स्वच्छतेची असा संदेश देणारी कापडी पिशवी विद्यार्थ्यांना दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.