चरसच्या नशेसाठी दुचाकींची चोरी, चोरटा साथीदारासह अटकेत    

ठाणे – चरसच्या नशेसाठी पैसे नसल्याने तरुणाने भिवंडी शहरातून तब्बल ८ दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.. व्यसनी चोरट्यासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे..

भिवंडीतील शेलार गावात राहणारे जितेंद्र शुक्ला हे चाविंद्रा परिसरातील काश्मीरी ढाब्यावर २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमाराला दुचाकी घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी ढाब्यासमोर दुचाकी उभी केली होती. त्यावेळी आरोपी दुचाकी चोरत असतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले.

याप्रकरणी दुचाकीच्या चोरीची तक्रार शुक्ला यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार व्ही. बी. जाधव सह पोलीस हवालदार पी. बी. तोडसे, पोलीस हवालदार आनंद पाटील, जयेश मुकादम, बाळा जाधव या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे आरोपी करणला सापळा लावून ताब्यात घेतले. करण गोसावी (२२) हा भिवंडीतील अत्तरपाडा, शेलार परिसरात राहणारा आहे. तर चोरीच्या दुचाकींच्या विक्रीसाठी मदत करणाऱ्याचे नाव प्रशांत शेलवले (२०) असून तो शहापूर तालुक्यातील दोनघर परिसरात राहणारा आहे.पोलीस तपासात त्याने तब्बल ८ दुचाकी भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या चोरी केलेल्या दुचाकी साथीदाराच्या मदतीने ४ ते ५ हजार रुपयात विक्री केल्याचेही त्याने सांगितले. या पैशातून तो चरसची नशा करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.दरम्यान या दुकलीने चोरून विक्री केलेल्या सुमारे २ लाख २८ हजार किंमतीच्या ८ दुचाक्या भिवंडी तालुका पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. बी. जाधव करीत आहेत.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email