घातक रसायन कंपनीत आणून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न,मालकासह इतर तिघा विरोधात गुन्हा दाखल

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – डोंबिवली एम आय डी सी मधील एका कंपनीत पर्यावरणास घातक असलेले रसायन टॅंकर द्वारे कंपनीत आणून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघड होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मालकासह इतर दोघा विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा एम आय डी सी येथील मेसर्स सह्याद्री केमिकल्स कंपनी मध्ये काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका टॅंकरच्या सहाययने मानवी जीवितास व पर्यावरणास घातक असलेले रसायन बेकायदेशीर पणे कंपनीत आणून या रसायनाची बेकायदेशीर पणे विल्हेवाट लावत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला माहिती होती या नुसार प्रदूषण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारि अमर दुरगुळे यांना ही बाब निदर्शनास आल्याने या प्रकरणी त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी कंपनी मालक विजय भाने,कंपनी मॅनेजर ,टँकर चालक ,मालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.