घरोघर मतदार नोंदणीत आता गृहनिर्माण संस्थांची मदत

२२ हजार गृहनिर्माण संस्थांचे

पदाधिकारी स्वयंसेवक म्हणून काम करणार

(श्रीराम कांदु )

 ठाणे दि २३: घरोघर मतदार नोंदणीत आता सहकारी गृहनिर्माण संस्था देखील प्रशासनाला मदत करण्यासाठी उतरल्या आहेत. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची बैठक नियोजन भवनात  झाली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मार्गदर्शन व सुचना केल्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यावर नवीन मतदार नोंदणीसाठी शासनाने जबाबदारी टाकली असून त्यांनी आपल्या संस्थांमधील मतदार नोंदणीत ब्लॉक लेव्हल व्हॉलीइंटर म्हणून स्वयंसेवकाचे काम करायचे आहे.

यावेळी उपनिबंधक शेखर पाटील, अशोक कुंभार, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, मानद सचिव ज्ञानू चोरगे उपस्थित होते.

फरोग मुकादम यांनी यावेळी नवीन मतदार नोंदणीचा वेग वाढणे आवश्यक असून ठाणे जिल्ह्यातील २२ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या राष्ट्रकार्यात उतरणे आणि सहभाग देणे आवश्यक आहे असे सांगितले. नवीन नोंदणी करतांना स्थलांतरित, मयत रहिवाशांची नावे देखील मतदार नोंदणी अधिकाऱ्यास व्यवस्थितरित्या सांगावी असे त्या म्हणाल्या. संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात मतदार यादीत रहिवाशांची नोंद असल्याचे प्रमाणपत्र जोडावयाचे आहे अशी माहिती उपनिबंधक अधिकाऱ्यांनी दिली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email