घराला कुलुप लावून गेलेल्या कुटुंबाचा 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास

कल्याण : घराला कुलुप लावून देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात घडली आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याण पूर्व तिसगाव परिसरात सत्यम शिवम सुंदरम सोसायटी मध्ये राहणारे आकाश गायकवाड 24 हे गेल्या बुधवारी  घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी कुटुंबासह गुजरात येथे गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा मिळून एकूण 37 हजरांचा मुद्देमाल लंपास केला .देवदर्शनाहुन घरी परतल्यानंतर गायकवाड यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकर्णी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email