घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उपकरणे प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संपन्न प्रदर्शनात ५० हुन अधिक कंपन्यांचा सहभाग

म विजय

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ”स्वच्छ सर्वेक्षण२०१८”अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया उपकरणे प्रदर्शनाचे उदघाटन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. ठाण्यातील  शिवाजी मैदान ,तलावपाळी स्टेशनरोड येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल ५० हुन अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. या उदघाटन संभारंभाला उपमहापौर रमाकांत मढवी,सभागृह नेते नरेश मस्के, नौपाडा कोपरी प्रभाग  समिती अध्यक्षा शर्मिला गायकवाड पिंपळोलकार.
नगरसेविका पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त  अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित, सहाय्यक आयुक्त श्री मकेश्वर, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ.हळदेकर आदी महापालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  प्रदर्शातील प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन कचरा व्यवस्थापनातील नवनवीन  तंत्रज्ञान माहिती घेऊन ठाणेकर नागरिकांना त्यांच्या रोजच्या घरगुती  कचऱ्यापासून  ते मोठंमोठ्या सोसायट्यामध्ये कचरा व्यवस्थापन करून त्याच्या पासून जैविक खत निर्मिती कशी करता येईल. आदीची माहिती महापौर  मीनाक्षी शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी,अधिकारी यांनी घेतली.

यावेळी या प्रदर्शनात ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणे आणि ”स्वच्छ सर्वेक्षण २०१८” या स्टॉल्सला देखील भेट देऊन डीजी ठाण्याबद्दलची व ”स्वच्छ सर्वेक्षण २०१८” ची सद्यस्थितील माहिती घेण्यात आली.या दोन्ही उपक्रमाचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कौतुक केले.

या प्रदर्शनाला ठाण्यातील नागरीकांसह शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन कचरा व्यवस्थापनातील तंत्रज्ञान जाणून घेतले.सदर प्रदर्शनात किचन मधील दैनंदिन ओल्या कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती कशी केली जाते याची निवडक उपकरणे प्रदर्शनात मांडली आहेत . मोठमोठ्या सोसायट्या मध्ये निर्माण होणार  ओला व सुका कचऱ्याचे एकत्रितरित्या व्यवस्थापन करून  त्याच्यापासून खत निर्मितीची  काही  प्रात्यक्षिके देखील काही कंपन्यांनी यावेळी दाखवले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email