ग्राहकांच्या सिलेंडरमधून गॅसची विक्री , पाच जणांना अटक,अडीच लाखांचा मुद्देमाज जप्त 

 

अडीच लाखांचा मुद्देमाज जप्त

क्राईम ब्रान्चच्या पथकाने केली अटक 

 (स्वदेश मालवीय)

उल्हासनगर – घरगुती वापराच्या ग्राहकांच्या गॅस सिलेंडरमधून परस्पर एक ते अडीच कीलो गॅस दुस-या सिलेंडरमध्ये भरून तो गॅस व्यावसायिक ग्राहकांना विकत घरगुती ग्राहकांची फसवणुक आणि गॅसची चोरी करणा-या पाच कामगारांना क्राईम ब्रान्चच्या पथकाने अटक केली आहे. विलाश शेळके (२८), सुखदेव जाधव , सोमनाथ जाधव , सुनिल सुर्यवंशी , आणि रामदेव यादव अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाज जप्त करण्यात   आला आहे.   

 

उल्हासनगर येथील कॅम्प नंबर एक येथील माया बॅस सव्हीस या दुकानातून ग्राहकांना वाटप करण्यासाठी असलेले ६९ घरगुती वापराचे सिलेंडर अनधिकृतपणे कॅम्प नंबर तीन येथील रेड्डी कम्पाऊण्ड ब्लॅक रोड, काकाच्या ढाब्याजवळ असलेल्या एका दुकानात नेवून सदर सिलेंडरमधील प्रत्येकी अंदाजे दोन ते अडीच कीलो गॅस काढून तो गॅस एका रिकाम्या व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या भरण्यात येत होता. तसेच सदर प्रकरातून घरगुती वापरासाठी गॅस बुक करणा-या ग्राहकांची आणि शासनाची फसवणुक करण्यात येत होती. या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली असता, गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास धाड टाकत या प्रकरणी, पोलिसांनी विलाश शेळके (२८), सुखदेव जाधव (२६), सोमनाथ जाधव (२७), सुनिल सुर्यवंशी (३८) आणि रामदेव यादव (२२) अशा पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून घरगुती आणि व्यावसायिक वापराचे ६९ सिलेंडर तसेच दोन टॅम्पो आणि २ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे भरत नवले यांनी अत्यावश्यक वस्तु, कायदा कलम तीन, सात आणि आठ लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस, (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अण्ड डिस्ट्रीब्युशन अंतर्गत उल्हासनगर सेन्ट्रल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह व पोलिस सह आयुक्त मधुकर पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोहर पाटिल, सहायक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे , पोलिस उपनिरीक्षक तोरगल , सहायक पोलिस निरीक्षक एस. के. पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर्यन सोदागर ,पोलिस हवलदार तावडे, पोलिस नायक वी डी पदमेरे, पोलिस काॉस्टेबल डीबी भोसले, सहायक पोलिस हवलदार जंगम यांनी सदर करवाई केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email