ग्राहकांचे मीटर क्रॉस चेक करण्याचे आदेश,सेन्ट्रलाईज बिलिंगमुळे ग्राहकांना मिळणार अचूक व वेळेत बिल

ग्राहकाने वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुल करा – सतीश करपे

कल्याण -‘महावितरणने ग्राहकांना दिलेली वीज व त्याचे होणारे बिलिंग यात मोठी तफावत राहत आहे. यामुळे महावितरणचा मोठा आर्थिक तोटा होत आहे. याचा एकूणच परिणाम ग्राहक सेवेवर होत आहे. म्हणूनच ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होणे अपेक्षित असून, मीटर रीडिंग एजन्सीने रीडिंग घेतल्यानंतर महावितरणमार्फत त्या रीडिंगचे क्रॉस चेकिंग होणे गरजेचे आहे. तसेच सेन्ट्रलाईज बिलिंगवर सर्वांनी योग्य काम करणे गरजेचे असून नव्याने सुरु झालेल्या या कार्यप्रणालीमुळे ग्राहकांना वेळेत व अचूक बिल मिळणार आहे.’ असे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री सतीश करपे यांनी दिले. कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कल्याण झोनचे मुख्य अभियंता रफिक शेख व नाशिक झोनचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर उपस्थित होते.

सतीश करपे पुढे म्हणाले, ‘वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होण्यासाठी अचूक बिलिंग होणे गरजेचे आहे. याकरता अधिकाऱ्यांनी मीटर चेकिंग एजन्सीवर योग्य नियंत्रण ठेवावे. तसेच एजन्सीने रीडिंग घेतल्यानंतर त्या रीडिंगचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी क्रॉस चेकिंग करावे. यामुळे कामात हयगय करणाऱ्या एजन्सीवर लक्षात येऊन त्यांच्यावर कारवाही करणे सोपे होईल. तसेच सेन्ट्रलाईज बिलिंगमुळे हे काम अधिक गतिमान होणार असून यामध्ये अधिक सुसूत्रता येणार आहे. याचबरोबर ज्या भागात वीज गळती जास्त आहे, अशा परिसरात वीज चोरी विरोधी पथक तयार करून ग्राहकांच्या मीटरची तपासणी करावी. तसेच मीटरशी छेडछाड करणाऱ्या ग्राहकांवर कारवाही करावी.’

यावेळी वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अनिल बराटे, मानव संसाधन विभागाचे उप महाव्यवस्थापक सुनिल पाठक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उप महाव्यवस्थापक योगेश खैरणार, कल्याण मंडल-१चे अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कल्याण मंडल-२चे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर, वसई मंडलचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर, पालघर मंडलचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, सिंधुदुर्ग मंडलचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, रत्नागिरी मंडलचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेटकर, नाशिक मंडलचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, अहमदनगर मंडलचे अधीक्षक अभियंता(प्रभारी) जीवन चव्हाण, मालेगाव मंडलचे अधीक्षक अभियंता(प्रभारी) संदीप दरवडे, पेण मंडलचे अधीक्षक अभियंता(प्रभारी) दिलीप खानंदे, वाशी मंडलचे अधीक्षक अभियंता(प्रभारी) सिंहाजीराव गायकवाड, ठाणे मंडलचे अधीक्षक अभियंता(प्रभारी) राजेश थूल, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी (प्रभारी), विश्वजीत भोसले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email