गोळवलीतील अनधिकृत बांधकामावर करवाई व्हावी यासाठी नगरसेवक रमाकांत पाटील यांचा वरिष्ठ पताळीवर पाठपुरावा

(राजेश सिन्हा)

डोंबिवली-कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १०९ गोळवली येथे अनधिकृत बांधकामांना पेव फुटला आहे.या प्रकरणी पालिकेकडे वारंवार मागणी करूनही कारवाई होत नसल्याने गोळवलीचे भाजपचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी कारवाईसाठी आता मुख्यमंत्री,तसेच नगरविकास गृहराज्यमंत्री,यांच्याकडे दाद मागितली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १०९ गोळवली येथे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे.८ ते १० मजल्यांची निवासी तसेच वाणिज्य वापराची बांधकामे येथे होत असून वारंवार याप्रकरणी तक्रार करूनही पालिका अधिकारी याप्रकरणी करवाई करत नाहीत.असा आरोप येथील स्थानिक नगरसेवक रमाकांत पाटील यांनी केला आहे.त्यानी याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस ,नगरविकास गृहराज्यमंत्री रणजीत पाटिल,नगर विकास मंत्रालायाच्या सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांना एक निवेदन दिले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी तसेच करवाई न करणा-या अधिक-यांवर करवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
या प्रकारच्या अनधिकृत बांधकामाचे सांडपाणी,मलनिचरा ,तसेच अनधिकृत बांधकामातुन निघणारे मटेरियल गोळवली व दावडी येथील नैसर्गिक नाल्यात येते त्यातून हे नाले तुंबत असून त्याच्या दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे.गोळवली व दावडीसह मुख्य शीळ कल्याण मार्गावरही सांडपाणी जमा होते.डेंग्यु,मलेरिया,टायफाईड सारखे गंभीर आजार येथे पसरतात.त्याचप्रमाणे घाटकोपर येथील ईमारत कोसळल्याची घटना पहाता येथे त्याप्रकारची घटनाही घडू शकते व जिवित हानी होवू शकते.भ्रष्ट व हलगर्जी पालिका अधिकारी,भूमाफिया,स्थानिक नेते यांच्या आश्रयाने सदर बांधकामे होत असल्याचा आरोपही त्यानी निवेदनात केला आहे.नगरसेवक पाटील यांनी या संदर्भात पालिका अधिक-यांकड़े लेखी,तोंडी पाठपुरावा करुन देखिल अनधिकृत बांधकामावर कोणतीच कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.सामान्य नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या बांधकामांवर करवाई न करणा-या पालिका अधिक-यांवर करवाई करावी अशी मागणीही नगरसेवक रमाकांत पाटील यांनी निवेदनात केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email