गोर-गरीब जनतेचा पैसा परत करा नाहीतर बडोदा बँकेचे नाव ‘दरोडा बँक’ करा – खासदार राजन विचारे

( तेजस राजे )

रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी बँक ऑफ बडोदा जुईनगर शाखेवर पडलेल्या भीषण दरोड्याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या खातेदारांचे लॉकर्स फोडण्यात आले आहेत त्या खातेदारांना न्याय मिळवा आणि त्यांची झालेली नुकसान भरपाई त्यांना मिळावी यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी यांनी बँक ऑफ बड़ौदा सेक्टर ११, सानपाडा, जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ येथे घटनास्थळी भेट दिली.

त्यावेळी शहरप्रमुख विजय माने, महिला संघटक रंजना शिंत्रे, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेविका ऋचा पाटील, नगरसेवक नामदेव भगत, रंगनाथ आवटी, ज्ञानेश्वर सुतार, काशीनाथ पवार, किरण मढवी, राजेश शिंदे, माजी नगरसेवक दिलीप घोडेकरर विभाग प्रमुख मिलिंद सूर्यरावव, शाखाप्रमुख महेश कोटीवले उपस्थित होते.

या भेटीत बँकांचे वरिष्ठ अधिकारी अनुउपस्थित असल्यानेे खा. विचारेे यांनी या भेटीत अनुउपस्थित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून जाब विचारलाा व त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ५ तास ठाण मांडून बसले तत्पूर्वी बँक मॅनेजरला तुमच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून एवढ्या मोठया बँकेत सी सी टी व्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक व कोणतीही धोक्याची सूचना देणारे गजर न बसविल्याने या दरोड्यात आपल्या बँकेतील आपण व आपला कर्मचारी पैकी व्यक्ती जबाबदार असल्याने त्यांना पाठीशी घालू नका असे खासदार राजन विचारे यांनी ठणकावले.

तसेच या बँकेतील ज्या ३० लॉकर धारकांचे लॉकर फोडले व ४८ रिकामे लॉकर का फोडले नाहीत याचा जाब विचारते क्षणी बँककमॅनेजर सीमा कुमाश्री हिने आम्ही लॉकर मध्ये काय ठेवतोय याची आम्ही माहिती ठेवत नाही त्यावेळी विचारे यांनी लॉकर मध्ये उद्या बॉम्ब ठेवलात तर तुम्ही काय कराल ? असा सवाल उभा केला त्यामुळे या लॉकर धारकांचे पैसे परत कधी करणार विचारले असता याचा वरिष्ठ निर्णय घेतील त्यावेळी बँकेचे डी.आर.एम बाबू रवीशंकर आल्यानंतर त्यांच्या या ३० लॉकर धारकांची रक्कम परत देण्याची जबाबदारी न घेत असल्याचे निर्दशनास आल्या नंतर त्यांना बँकेचे नुकसान झाल्यास याला शिवसेना जबाबदार राहणार नाही अशी तंबी दिली.

त्यांना फक्त बँकेच्या लेटर पेपरवर यांना पैसे परत देण्याची जबाबदारी बँकेची आहे असे लिहून मागितले होते ते सुद्धा देण्यास टाळा टाळ करत होते त्या नंतर खासदार विचारे यांनी शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून त्यांना पैसे परत देण्याची जबाबदारी बँकेची असेल असे लिहून घेतले त्यानंतर शिवसैनिक शांत झाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email