गोग्रसवाडी परिसरातील बंदिस्त नाले झाले नशा ओढणार्याचे अडडे

डोंबिवली,ता ३   गोग्रसवाडीसह डोंबिवलीच्या काही भागातील मोठे नाले सध्या नगरसेवक निधीमार्फत बंदिस्त केले जात आहेत.या नाल्यावर
ओपन जिम्स,ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे ठेवले जात आहेत पण सध्या या बंदिस्त नाल्यावर व्यसनी लोकांचा वावर वाढला आहे
चरस,गांजा,अफु ंयाचे व्यसन करणारे ही केंद्रे ठरत असून स्थानिक नगरसेवक,टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार करुनही त्याची दाद घेतली जात
नाही कोणी नागरिक जर याला विरेाध करु लागले तर त्याना शस्त्र दाखवून दमदाटी करण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगीतले ऐके काली
गोग्रसवाडी भाग निसर्ग संपन्न म्हणून प्रिसध्द होता,येथे पूर्वी सिनेमांचे चित्रिकीरणही होत असल्याच्या आठवणी ज्येष्ठ नागरिक संागतात व आता हा भाग
नशा ओढणार्याचा अडडा होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार दारु,सिगरेट या वस्तू महाग झाल्याने या कमी किंमतीच्या व्यसनाकडे ओढा वाढल्याचे संागण्यात येते
गोग्रसवाडी,पाथर्ली,सांगर्ली,आयरे,जिजाई नगर,क्रीडा  संकुल या भागात स्थानिक नगरसेवक मोठे नाले बंद करत असून तेथे ओपन जिमची सोय करत
आहेत,ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून बाकडे ठेवत आहेत पण याचा उपयोग कोणी करत नाही उलट त्या जागेवर आता परिसराच्या भागातून तरुण
पिढी व्यसनासाठी येत आहे ”काला सोना ”म्हणून या व्यसनी पदार्थाना ‘गुप्त’नाव देण्यात आले असून शेलार नाक्याजवळ  असलेल्या झोपडपटटीत या
वस्तू मिळतात अशी माहिती देण्यात आली.गेाग्रसवाडीतील लक्ष्मण छाया,वेणू स्मृति,तुकाराम भवन,वरद विनायक या भागातील नागरिकांनी वारंवार तक्रार  केली असून
या जवळ च शाळा  पण असल्याने शालेय विद्यार्थी या व्यसनाकडे ओढले जात आहेत.पोलीसांच्या भरारी पथकाने या भागात वांरवार फेर]या मारण्याची
मागणी नागरिक करत आहेत.या व्यसनी तरुणांना राजकीय पाठबळ  मिळत असल्याचा आरोप एका तरुणाने संतप्तपणे केला पण घरच्या लोकांना त्रास
होईल अशी भिती असल्याने नाव देण्यास नकार दिला.डोंबिवली सुशिक्षित शहर असून ते अनधिकृत बांधकामांचे म्हणूनही प्रिसध्द आहे आता ते व्यसनी
लोकांचे केंद्र  होण्याची भिती व्यक्त होत आहे. पोलिसाना मोठया प्रमाणात हफ्ता मिळत असल्याने व स्थानिक नगरसेवक यांचे कार्यकर्ते असल्याने यांचे फावत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.