गेल्या वर्षभरात भारताच्या व्हिसा व्यवस्थेचे उदारीकरण

देशाची सुरक्षा सुनिश्चित करतानाच भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी भारताने एक मजबूत व्हिसा व्यवस्था तयार केली आहे. गेल्या वर्षभरात गृह मंत्रालयाने भारतातील व्हिसा प्रक्रिया सुलभ बनवण्यासाठी केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे-

जगभरातील सर्व देशांसाठी व्यवहारिकदृष्ट्या आता इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुविधा सुरू करण्यात आली आहे. 166 देशांचे परदेशी नागरिक आता 26 विमानतळ आणि 5 बंदरांवर या नवीन सुविधेचा लाभ घेऊ शकतील. इमिग्रेशन काऊंटरवर येईपर्यंत परदेशी नागरिकांना कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची गरज पडणार नाही. ब्युरो ऑफ इमिग्रेशन साधारणपणे 24 ते 28 तासात परदेशी व्यक्तीला ही व्हिसा देण्याबाबत निर्णय घेतो. 30 ऑक्टोबर 2018 पर्यंत भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या 18.78 लाखांवर गेली आहे.

अलिकडेच ई-व्हिसाच्या ई-कॉन्फरन्स आणि ई-मेडिकल अटेंडंट या दोन श्रेणी सुरू करण्यात आल्या. आता 5 श्रेणीमध्ये ई-व्हिसा उपलब्ध आहे. यामध्ये टुरिस्ट, बिझनेस, मेडिकल, कॉन्फरन्स आणि मेडिकल अटेंडंट यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक व्हिसाचा अवधी 90 दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी स्थानिक एफआरआरओला सक्षम बनवण्यात आले आहे. तसेच ई-व्हिसा आता एका वर्षात तीन वेळा उपलब्ध होईल.

जे परदेशी नागरिक भारतात आहेत आणि त्यांना कॉन्स्यूलर किंवा व्हिसा सेवांची गरज असेल तर त्यासाठी ऑनलाईन ई-एफआरआरओ सुविधा सुरू करण्यात आली आहे.

क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पाच प्रमुख बंदरांवर इमिग्रेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिथे किनाऱ्यावरील स्थळ दर्शनासाठी प्रवाशांना ई-लॅडींग परवाना दिला जातो.

भारतातील वास्तव्यादरम्यान आजारी पडणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या व्हिसाचे मेडिकल व्हिसामध्ये रुपांतर केल्याशिवाय वैद्यकीय उपचार मिळू शकतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email