गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात लाचखोरांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यांच्या संख्येत 2016 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ
गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात लाचखोरांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यांच्या संख्येत 2016 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.ठाणे परिक्षेत्रात नवीमुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भाग येत असून येथील सापळ्यांची ही टक्केवारी आहे.तर,दरवर्षी प्रमाणे यंदाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात भ्रष्टचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.तसेच शहरी आणि ग्रामीण भागात भ्रष्टचार निर्मूलनाबाबत जनजागृती सुरु असून सिनेमागृह,मल्टिप्लेक्समध्येही लाचखोरीला आळा घालण्याचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे’ हा फलक लावण्याबात सूचना देण्यात आल्या आहेत.हा सप्ताह साजरा होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात लाचखोरी, अपसंपदा आणि अन्य भ्रष्टचाराचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.या वर्षात 1 जानेवारी ते 1 नोव्हेंबर या कालावधीत सापळ्यांची एकूण संख्या 89 इतकी आहे.यामध्ये ठाणे 50,पालघर 7,नवीमुंबई 8,रायगड 7,रत्नागिरी 10 आणि सिंधुदुर्गमध्ये 7 सापळ्यांचा समावेश आहे.मात्र,याच कालावधीत मागील वर्षीच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता ठाणे जिल्ह्यात सापळ्यामध्ये 22 टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.ठाण्यात सापळे 89,अपसंपदा 06 आणि अन्य 05 अशा एकूण 100 गुन्ह्यांची नोंद असून तुलनेत ठाणे परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यात लाचखोरीत घट झाली आहे.04 नोव्हेंबर पर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जनजागृती सप्ताह होत आहे. ठाणे लाचलुचपत विभागाच्यावतीने एनकेटी सभागृहात “Don’t Pay Bribes” हा जनजागृती कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमांतर्गत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संग्राम निशाणदार यांनी उपस्थित नागरिक आणि व्यापारी वर्गाला लाच-लुचपत विरोधी विभागाचे अधिकार तसेच कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेविका प्रतिभा आणि डॉ.राजेश मढवी तसेच व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी कमलेश श्रीश्रीमल उपस्थित होते.