गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने  डोंबिवली दरबार हॉटेलला आग

हॉटेल जाळून खाक

(श्रीराम कांदु)

डोंबिवली –  डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार हॉटेलला गृरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. हॉटेलमधील गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागली असून या आगीत हॉटेल जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही मिनिटाच आग आटोक्यात आणली.

   श्रम साफल्य बिल्डींगमध्ये गेल्या नऊ वर्षापासून डोंबिवली दरबारहॉटेल सुरु होते. गुरुवारी अचानक हॉटेलमधील गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागल्याची माहिती हॉटेलमालक राजेंद्र पांडुरंग देशमुख यांनी दिली. आगीची धग बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यापर्यत गेल्याने इमारतीतील रहिवाशी घाबरून इमारतीखाली आले. अग्निशमक दलाला जवानांनी काही वेळातच आग विझवली. मात्र हॉटेल मधील  लिकेज झालेले गॅस सिलेंडर जवानांनी रस्त्यावर ठेवल्याने रहिवाशी आणि नागरिकांनी याबद्दल पोलिसांना जाब विचारला. हॉटेलमधील तीन मोबाईलहि जळून खाक झाले.अग्निशामक दलाच्या जवानांना काही नागरिकांनी मदत केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email