गॅसचा टँकर पलटल्याने घोडबंदर रोड येथे वाहतुक कोंडी
म विजय
ठाणे-घोडबंदर रोड येथे एक गॅसचा टँकर पलटल्याने गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.सदर वाहतुक कोंड़ीचा वाहनचालक व प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला .सदर गॅसच्या टँकरचा स्फोट होण्याची भीती देखिल वर्तवण्यात येत होती तर दुसरीकडे रहदारी विस्कळीत झाल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती .यावेळी वायु गळती झाल्यास मोबाईलच्या माध्यमातून दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेता लोकांना मोबाईल बंद करायला सांगण्यात आले.अखेर अग्निशामक दल व पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर परस्तिती नियंत्रणात आली आणि वाहतुक सुरळीत झाली.
Please follow and like us: