गृह व नगरविकास राज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे अनधिकृत बांधाकामांवर कारवाई करायची  नगरसेवक रमाकांत पाटिल यांची मागणी

श्रीराम कांदु 

वारंवार अनधिकृत बांधाकामांवर कारवाई करायची मागणी करूनही पालिका अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या एका नगरसेवकानी याप्रकरणी गृह व नगरविकास राज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.यात या अनधिकृत बांधाकामांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १०९ म्हणजेच गोळवली येथे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम चालु आहे.या विभागाचे नगरसेवक रमाकांत पाटिल व भाजपा कार्यकर्ते यांनी याप्रकारच्या अनधिकृत बाधकामांबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.परंतु पालिका अधिका-यांनी अद्द्याप कुठल्याही अनाधिकृत बाधाकामावर करवाई केली नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.अधिकारी वर्गाला बिल्डरकडून प्रचंड प्रमाणात पैसे मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.तसेच अनाधिकृत बांधकाम करणारे बिल्डर ,भूमाफिया यांच्यावर एमआरटीपी कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणीही  नगरसेवक रमाकांत पाटिल यांनी निवेदनात केली आहे.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलिला स्मार्ट सिटी योजनेत घेतले आहे.असे असतानाही या प्राभागत गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली अनाधिकृत बांधकामे चालूच आहेत.यामुळे शहराचे विदृपिकरण होता आहे तसेच पावसाळ्यात सांडपाण्याची समस्या ,पानी टंचाई,साथिच्या रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्या निर्माण होतात.त्याच प्रमाणे या अनाधिकृत बांधकामांचा दर्जा देखील चांगला नसल्याने या इमारती कोसळुन जीवितहानी घडू शकते अशी भीतीही त्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.या विभागातिल अनधिकृत बांधाकामांची यादीही त्यांनी या निवेदानाबरोबर पाठवली आहे. या बांधाकामांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृह व नगरविकास राज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे केली आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email