गुन्हे वृत्त कल्याण डोंबिवली
बेशिस्त रीक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले चौक समोरील रस्त्यावर काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथला निर्माण होईल अशा प्रकारे बेशिस्तपणे रिक्षा उभी केल्याचे निदर्शनास आल्याने महात्मा फुले पोलिसांनी बाबू खाडे या रिक्षा चालका विरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भरधाव दुचाकीच्या धडकेत आठ वर्षाचा मुलगा जखमी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील गांधी नगर बालाजी कृष्णा इमारती मध्ये राहणारी महिला आपला आठ वर्षाचा मुलगा पार्थ याला घेवून गुरुवारी दुपारी गांधी नगर परिसरातून घराच्या दिशेने पायी जात असतना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीनेपार्थ ला जोरदार धडक दिली .या धडकेत पार्थ तोंडला पायाला गंभीर दुखापत झाली या प्रकरणी पार्थ याच्या आईने अज्ञात दुचाकीचालका विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात तक्रर नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून ५० हजारच्या रोकड सह मोबाईल लंपास
डोंबिवली : डोंबिवली गोग्रासवाडी येथे तिरुपती दर्शन येथे राहणाऱ्या पदमबहादूर सिजापती यांच्या घराचा दरवाजा काळ सकाळ च्या सुमारास उघडा होता हि संधी साधत या उघड्या दरवाजावाटे घरात घुसून अज्ञात चोरट्याने ५२ हजार रोकड व ४ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मिळून एकूण तब्बल ५६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.काही वेळाने सिजापती यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
कल्याण पूर्वेत घरफोडी
डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील कोलशेवाडी जिम्मी बाग परिसरातील परशुराम वाडी येथे राहणारे अमित आंबवगावकर काल सकाळी नवू वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने ,रोकड असा मिळून एकूण ६० ह्जाराचा मुद्देमाल लंपास केला .सायंकाळी घरी परतल्या नंतर आंबवगावकर यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानि अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे
