गुन्हे वृत्त कल्याण डोंबिवली

 स्टटकरत असताना रागाने पहिले म्हणून एका तरुणावर प्राणघातक हल्ला

बंदुकीचा धाक दाखवत सव्वा लाखाची चैन लंपास

डोंबिवली  : दुचाकीवर  भरधाव वेगाने स्टट करत असताना आपल्या कडे पाहणाऱ्या एका तरुणाला सहा जणांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अनिकेत पुजारी ,शाहबाज सय्यद ,रोहित गिरी व त्याच्या तीन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

        कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात कृष्णकुंज सोसायटी मध्ये राहणारा अविनाश उर्फ अमोल येवले हा शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास  जोशी बाग परिसरात आपल्या दुचाकीवर बसला होता . यावेळी अनिकेत पुजारी हा भरधाव वेगाने स्टट करत आला व त्याने येवले समोर आपली दुचाकी थांबवली त्यामुळे येवले ने त्याच्याकडे बघितले .अनिकेत आणि त्याच्या साथीदारांनी आमच्याकडे रागाने का बघतोस असे विचारत त्यांच्याशी बाद घालण्यास सुरुवार करत ठोशा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली .तर अनिकेत चा साथीदार शाहबाज सैय्यद याने स्वत जवळील पिस्तुल येवले यांच्या तोंडात ठेवून गोळी घालण्याची धमकी देत अनिकेत ,शाहबाज आणि रोहित ने तलवार आणि चोपर ने येवले वर हल्ला चढवत पोटावर आणि डोक्यावर खांद्यावर वार केले व त्याच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून तेथून पळ काढला  .या हल्ल्यात येवले गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याने दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अनिकेत पुजारी ,शाहबाज सय्यद ,रोहित गिरी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

कल्याण पूर्वेत घरफोडी

डोंबिवली  : कल्याण पूर्वेकडील कोलशेवाडी परीसारतील जिम्मी बाग परिसरात परशुराम वाडीत राहणारे अमित आंबगावकर शुक्रवारी सकाळी काही निमित्त सकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते हि संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड मिळून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .सायंकाळी घरात परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलीसनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

खोणी येथील नौदलाच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण

मंदिराचे काम सुरु ,अतिक्रमण रोखण्यास गेलेल्या अधिकार्यासोबत घातला वाद

मानपाडा पोलीस स्थानकात चार जाणा विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली  : नेवाळी नजीक असलेल्या खोणी येथे नौदलाच्या आरक्षित भूखंडावर ग्रामस्थांनी मंदिर उभारण्याचे  काम सुरु केले आहे .याबाबत विचारपूस करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांवर हुज्जत घालणाऱ्या चार जना विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असुन्या तक्रारी नुसार पोलिसांनी गुरुनाथ फुलोरे,जगदीश पाटील,किशोर पाटील,महेंद्र पाटील ,पिवन फुलोरे या चार जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

        नौदलासाठी आरक्षित असलेली जमीन  शेतकऱ्यांना  परत मिळावी  यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या हिंसक नेवाळी आंदोलनाला काही महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी आज हि या आंदोलनाच्या आठ्वणी ताज्या आहेत . या आंदोलना नंतर हि जागा वादग्रस्त ठरली होती .नेवाळी नजीक असलेल्या खोणी येथे सर्वे नंबर १२९ हा भूखंड नौदलासाठी आरक्षित आहे .या ठिकणी नौदलाचे अधिकारी अमितकुमार नायन हे आपल्या सहकार्यांसह गेले असता त्यांनी ठिकाणी त्यांना मंदिराचे पिलर उभारण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले .याबाबत नायन यांनी विचारपूस केली असता गुरुनाथ फुलोरे,जगदीश पाटील,किशोर पाटील,महेंद्र पाटील ,पिवन फुलोरे या चार जणांनी नायन यांच्याशी हुज्जत घातली तसेच या जागेसह आसपासची जागा आमची आहे असे सांगत या ठिकाणी मंदिर बांधणारच असे सांगत भांडण सुरु केले .या प्रकरणी नौदलाचे अधिकारी अमितकुमार नायन यांनी गुरुनाथ फुलोरे,जगदीश पाटील,किशोर पाटील,महेंद्र पाटील ,पिवन फुलोरे या चार जना विरोधात नौदलासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अतिक्रमण केल्याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी या चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email