गुजरातमध्ये भाजप जिंकली, पण मोदी हरले..

गुजरातमध्ये भाजप जिंकली, पण मोदी हरले..

गुजरातमध्ये भाजप जिंकली, पण मोदी हरले..

गुजरात : सा-या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी लागले. काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झालं. भाजपने २२ वर्षाची सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं असल तरी १५०  जागांचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपचा यशाचा रथ काँग्रेसने ९९ जागांवरच रोखला. भाजपच्या तब्बल १६ जागा घटल्या आहेत. काँग्रेसने ८० जागा मिळविल्यात. या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आलं. त्यामुळे भाजप जिंकली, पण मोदी हरले असेच चित्र स्पष्ट झालं.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपने ९९ तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या इतरांना ६ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ४९.१% तर काँग्रेसला ४१.५% मते मिळालीत. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेची केल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही कसोटी लागली होती. राहुल गांधी यांच्या सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी एकत्रीतपणे मोट बांधीत मोदीपुढं आव्हान उभ केलं होत. त्यामुळे ही निवडणूक मोदींसाठी प्रतिष्ठेची बनली होती. गुजरातमध्ये भाजपचं कमळं फुललं असलं तरी घवघवीत यश मिळवता आलेलं नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याचे दिसून आले. भाजपने विजय मिळवला असल तरी काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमुळे राहुल गांधी यांनी मैदान मारलं आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिंकले
राजकोट पश्चिम या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री विजय रुपाणी हे २५ हजाराच्या मताधिक्याने विजयी मिळविला. तसेच मेहसाणा मतदार संघातून उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे ३६८०७ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष जीतूभाई वाघाणी हे भावनगर पश्चिमेतून ५८३२४ मतांनी विजयी झालेत.

भाजपच्या जागा घटल्या, काँग्रेसच्या वाढल्या
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर भाजपला १५० जागा मिळतील असा दावा केला होता. पण भाजपला १०० चा आकडा ही गाठता आलेला नाही. भाजपला मागील निवडणुकीत ११५ जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी भाजपच्या तब्बल १६ जागा घटल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही पण त्यांनी मोदींच्या गडाला चांगलाच हादरा दिला. मागील २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला ६१ जागा आल्या होत्या. यावेळी काँग्रेसला जवळपास १६ जागा वाढल्यात.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email