गुंगीचा स्प्रे मारून १३ वर्षीय मुलीचे अपहरण

उल्हासनगर-गुंगीचा स्प्रे मारून बेशुद्ध करुन एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना उल्हासनगर क्रमांक ४ येथे घडली आहे.याप्रकराणी सदर मुलीच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक वृत्त असे की उल्हासनगर क्रमांक ४ येथल सेक्शन २६ मधील एक १३ वर्षीय मुलीगी घरात एकटी असताना तेथे दोन अज्ञात व्यक्ती आल्या.त्यानी घराची बेल वाजवली असता मुलीने दरवाजा उघडला . दोघा अज्ञात व्यक्तिनी तिच्या चेह-यावर गुंगीचा स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले आणि मोटरसायकलवरून तिला पळवुन नेले.सायंकाळी मुलीची आई घरी परतली तेव्हा शेजारच्यांकडून सदर प्रकार समजला. याप्रकराणी सदर मुलीच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email