गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड; १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

उल्हासनगर-  गावठी दारूच्या हातभट्टीवर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यावेळी गावठी दारू व वॉशसह १ लाख ६६ हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अंबरनाथ तालुक्यातील उसटणे गावाच्या शिवारातील खदाणीजवळील मोकळ्या जागेत विष्णु पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यानुसार महेश तरडे यांनी पथकासह गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकली. पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत, त्या भट्टीच्या ठिकाणाहून ५ ते ६ जणांनी पलायन केले.
त्या ठिकाणाहून पोलिसांनी हातभट्टीची साधने, १४ प्लॅस्टीकचे कॅन व २२ रबरी टयुबमधील १ हजार ३७० लिटर गावठी दारू व २८ प्लॅस्टीकच्या ड्रममध्ये भरलेला २ हजार ८०० लिटर असा १ लाख ६६ हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हिल लाईन पोलीस ठाण्यात विष्णु पाटील याच्यासह त्याच्या ६ सहकाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email