गायत्री महायज्ञाचे ठाणे महापौर यांच्या हस्ते कलश यात्रेने शुभारंभ
(श्रीराम कांदु)
ठाणे – यज्ञीय कर्मकांडाला वैज्ञानिक आणि भावनात्मक अशी भक्कम बैठक आहे. सृष्टीची सुव्यवस्था प्रदूषण निवारण, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वास्थ्य संवर्धन व संस्कार यासाठी यज्ञाची महत्त्वपूर्ण भूमिका आधुनिक वैज्ञानिकांनीही सिद्ध केली आहे या निमित्ताने गायत्री परिवार, ठाणे यांच्या द्वारे ५१ कुंडीय गायत्री महायज्ञ ९ ते ११ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत शिवाजी मैदान तलावपाळी, ठाणे (प) येथे मोफत संपन्न होत आहे
शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०१८ दु. ३ वा. घंटाळी मंदिर ठाणे पासून ते शिवाजी मैदान ठाणे येथे कलश शोभा यात्रेने या महायज्ञाची सुरवात ठाण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांचा हस्ते १२०० महिलां तुळस व कलश घेऊन सहभागी झाले होते या यात्रेत भारत माता, गायत्री मुर्ती आदीचे चित्ररथ होते यात्रेचे समारोप महाप्रसादाने झाले शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ सकाळी ८ ते दु. १२ वा. पर्यंत देव आवाहन व पूजन , यज्ञ व संस्कार विधी झाले संध्याकाळी ५ वा. विराट ११०० दीपयज्ञ संध्याकाळी ७ वा भोजन महाप्रसादाने संपन्नझाले तर रविवार ११ फेब्रुवारी २०१८ सकाळी ८ पासून देव पूजन, यज्ञ व संस्कार, सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत व्याखान रक्तदान शिबीर, स्वास्थ्य परीक्षण, व्यसन मुक्ति परामर्श होणार आहे. संध्या. ६ वा. पासून उद्बोधन आणि संगीत संध्या – एक शाम गायत्री के नाम आणि भोजन प्रसाद आयोजन करण्यात आले आहे
या महायज्ञासाठी सहयोगी मंडळ म्हणून इंदिरानगर महिला मंडळ, आजाद नगर महिला मंडळ, किसन नगर महिला मंडळ,मुलुंड महिला मंडळ, रघुनाथ नगर महिला मंडळ,लोकमान्य सोसा. महिला मंडळ, काल्हेर महिला मंडळ, भायंदर पाडा महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी ठिकाण गायत्री प्रज्ञा केंद्र, रघुनाथ नगर , ठाणे येथे ९३२४५१४९५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.