गाडीचा अपघात ; सहा ठार पाच जखमी

नाशिक – एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या क्रूझर गाडीचा आज सकाळी अपघात झाल्याची घटना पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील असून गाडीतील सर्वजण एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान ही गाडी एका एसटी बसला समोरून धडकली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email