गांजा विक्रेत्याला अटक
डोंबिवली – डोंबिवली नजीक पिसवली येथून मानपाडा पोलिसानी एका गांजा विक्रेत्याला अटक करत त्याच्याजवळील साडे बारा हजरांचा गांजा जप्त केला आहे .
डोंबिवली मानपाडा पोलीसाना पिसवली येथील महात्मा गांधी नगर झोपडपट्टी मध्ये एक इसम गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनसुर पोलिसानी त्याच्या घरात छापा टाकला असता त्यानं घरा बाहेरील मोकळ्या जागेत एका पिशवीत २ किलो ६५४ ग्राम अंदाजे साडे बारा हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला .मानपाडा पोलिसानी हा गांजा जप्त करत या प्रकरणी दशरथ राठोड याच्या विरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे .
Please follow and like us: