गळ्यावर किडा पडल्याचे सांगून एक लाख रुपये लंपास
डोंबिवली – कल्याण मध्ये भूलथापा देऊन रोकड दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .या वाढत्या घटना मुळे पोलीस यंत्रणा ही चक्रावल्या असून या भामट्याना गजाआड करण्यासाठी पोलिसानी जंग जंग पछाडले आहे .त्यातच काल एका भामटा बँकेतून एक लाख रुपये रोकड काढून आपल्या मोटरसायकल जवळ आलेल्या एका इसमाला गळ्यावर किडा असल्याची भुलथाप मारत लक्ष विचलीत करत रोकड असलेली पिशवी घेऊन पसार झाल्याची घटना घडली.या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला
कल्याण पश्चिम योगिधाम परिसरात राहणारा जॉन तोफिल 50 हे काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या आपल्या बँकेच्या खात्यातुन एक लाखांची रोकड काढून घराकडे परतत होते .जॉन बँकेबाहेर उभ्या केलेल्या आपल्या मोटर सायकजवळ आले असताना एक इसमाने त्यांना हटकले तुमच्या गळ्यावर किडा असल्याचे सांगितले .त्यामुळे जॉन यांनी आपल्या जवळील रोकड असलेली पिशवी मोटरसायकलला अडकवून शर्ट झटकन्यास सुरुवात केली .या संधीचा फायदा घेत या इसमाने त्यांची पिशवी हिसकावून तेथून पळ काढला .काही वेळाने जॉन याना आपली बॅग चोरल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .
Please follow and like us: