गणपतीसमोर जुगार खेळणारे १४ जण ताब्यात
माजलगाव – गणपती बाप्पांसमोर बसून जुगार खेळणाऱ्या १४ जणांना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री पात्रूड व टाकरवण येथे करण्यात आली. पोलीस निरीक्षक मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे, संतोष माने, नितीन राठोड, दीपक पवार, संतोष बाबरी, मोरे आदीनी केली. पात्रूडमध्ये आठ तर टाकरवणमधील सहा जुगारयांचा समावेश आहे. या सर्वांवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Please follow and like us: