गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल शहरात संमिश्र प्रतिक्रिया

(मुंबई आसपास टीम)
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी वेबनार वर बोलताना डोंबिवालिचा उल्लेख सर्वात घाणेरडे शहर असा केला तसेच अतिक्रमण करणारे लोकप्रतिनिधी यांच्यामुळे शहराची ही अवस्था असून त्यांना निवडून दिल्या बद्दल येथील नागरिकच याला जवाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यानंतर गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल शहरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

श्रीकांत शिंदे
खासदार ,शिवसेना,कल्याण लोकसभा
मुंबई आसपासशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की,गडकरी यांनी ज्या शब्दात डोंबिवलिचा उल्लेख केला ते योग्य नाही.रस्ता रुंदीकरणात कोणत्या पक्षाच्या लोकांनी बाधा आणली ते सर्वांनाच माहीत आहे.येथून वर्षानुवर्षे भाजपचे आमदार निवडून जात आहेत.त्यामुळे डोंबिवालिच्या दुर्दशेला भाजपाचे लोकच जवाबदार आहेत.याप्रकरणी आपण मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

उदय कर्वे
डोंबिवालितील जूने नागरिक उदय कर्वे हे गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हणाले की अतिक्रमणाबद्दल नागरिकांना जवाबदार ठरवणं चुकीचे आहे.याला लोकाप्रतिनिधिच जवाबदार आहेत.योग्य प्रकारे नियोजन न केल्याने कच-याची समस्या निर्माण होते.सुरवाती पासूनच येथून भाजपाचे आमदार निवडून जातात आता येथील आमदार राज्यमंत्री आहेत तर त्यांची जवाबदारी नाही का ?रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही.गडकरींनी डोंबीवलीबद्दल अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती.

मनोज घरत,
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
डोंबीवली शहर.
मनसेचे डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत हे गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हणाले की भाजपवाल्यांना थोडीही लाज असेल तर अनधिकृत बांधकामांची जवाबदारी स्वतावर घेवुन राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्यासह निवडून आलेल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा.

 

 

राहुल दामले
स्थायी समिती सभापती
तर कयाण डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की गडकरी यांचे डोंबिवलीवर भरपूर प्रेम आहे म्हणून त्यांनी या शहराबद्दलच्या आपुलकीमुळे सदर विधान केले.डोंबिवालित मोठ्या प्रमाणात भाजपला नागरिकांचा पाठिंबा आहे. परंतु येथे नियोजन निट प्रकारे झाले नसल्याने शहराची अशी अवस्था आहे.ही खंत त्यांच्या मनात आहे म्हणून त्यांनी हे विधान केले.जिथे प्रेम असते तेथेच बोलले जाते असे ते म्हणाले.

 

राजू पाटिल,
नेते मनसे
मनसेचे वरिष्ठ नेते राजू पाटिल म्हणाले की केवळ नगरसेवकच नव्हे तर पालिका अधिकारीही डोंबिवलीच्या दुर्द्शेला जवाबदार आहेत.अनेक ठिकाणी कचरा कुंडीदेखिल ठेवलेली नाही.मनपाचा निधि योग्यप्रकारे वापरला जात नाही.नगरसेवक व अधिकारी जनतेचा पैसा लुबाडतात.

 

 

राजेश मोरे
शहर प्रमुख, शिवसेना डोंबिवली
शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी गडकरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत सांगितले की शहराचा याप्रकारे उल्लेख करणे केन्द्रीय मंत्र्यांना शोभत नाही.मनपा प्राशासनाने अनधिकृत बांधकामांच्या तक्रारिंवर त्वरित कारवाई केली पाहिजे.

 

 

विकास काटदरे सर
वरिष्ठ पत्रकार
डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे सर यांनी याबद्दल बोलताना डोंबिवलीच्या दुर्दशेला सर्वच जवाबदार असल्याचे मत व्यक्त केले.१९७० पासून भाजप येथे निवडून येत आहे.शहर नियोजन रहित आहे.प्रशासनावर लोकप्रतिनिधींची पकड नाही.तसेच लोकप्रतिनिधि निवडून आल्यानंतर प्रभागात फिरतदेखिल नाहीत.काटदरे यांच्या मते गडकरी यांनी डोंबिवलीकरांच्या मनातली गोष्ट सांगितली आहे.

नविन सिंह,
माजी काँग्रेस नगरसेवक,

माजी नगरसेवक नविन सिंग यांनी गडकरी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.ते म्हणाले की राज्यात तसेच पालिकेत यांचीच सत्ता आहे तरी दुर्दशेला जनताच जवाबदार !ते पुढे म्हणाले की राज्यमंत्रीपण डोंबिवलीचेच आहेत तरी पण अशी अवस्था का आहे?शहरात पोस्टर्स लावून शहराची अवस्था सुधारत नाही.नविन सिंग असेही म्हणाले की डोंबिवलीची दशा नागपुरपेक्षा चांगली आहे याची गडकरी यांना कदाचित  जाणीव नसावी.डोंबिवलीला घाणेरडे शहर म्हणून गडकरींनी शहराचा अपमान केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email