गडकरी यांच्या डोंबिवलीच्या विधानानंतर अतिक्रमाणांचा प्रश्न पुन्हा चर्चेत

देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरु आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकाही स्वच्छता मोहिम राबवते आहे.परंतु काल एका वेबनार दरम्यान केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी डोंबिवलीचा उल्लेख सगळयात घाणेरडे शहर म्हणून केला .येथील स्थानिक नेते लोकप्रतिनिधि अतिक्रमण करत असून अशांना निवडून देणारे नागरिक याला जवाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गडकरी यांच्या या वक्ताव्यानंतर याप्रकरणी महापौर राजेन्द्र देवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डोंबिवलीत भाजपाचेच नगरसेवक जास्त प्रमाणात आहेत व आमदार तसेच राज्यमंत्रीही भाजपाचे आहेत.तरीही नागरिकांना यासाठी जवाबदार ठरवले जाते त्यापेक्षा हा सल्ला भाजपच्या लोकप्रतिनीधिना दिला असता तर डोंबिवालिची स्थिती सुधारली असती अशी प्रतिक्रिया देत गडकरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
तर कयाण डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की गडकरी यांचे डोंबिवलीवर भरपूर प्रेम आहे म्हणून त्यांनी या शहराबद्दलच्या आपुलकीमुळे सदर विधान केले.डोंबिवलित मोठ्या प्रमाणात भाजपला नागरिकांचा पाठिंबा आहे. परंतु येथे नियोजन निट प्रकारे झाले नसल्याने शहराची अशी अवस्था आहे.ही खंत त्यांच्या मनात आहे म्हणून त्यांनी हे विधान केले.जिथे प्रेम असते तेथेच बोलले जाते असे ते म्हणाले.
अनधिकृत बांधकामाचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजतोय.पालिका अधिकारी व नगरसेवक यांच्यातही याप्रकरणी वाद सुरु आहे.गोळवलिचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी त्यांच्या प्रभागात होणा-या अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेला अनेक तक्रारी दिल्या परंतु त्यावर कारवाई झाली नाही अखेर नगरसेवक पाटील यांनी याप्रकरणी काही मंत्र्याना निवेदन सादर करुन कारवाईची मागणी केली.त्याचप्रमाणे नगरसेवक मंदार हळबे यांनीही नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यात अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठवाण्यात आला होता.आता केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही शहर बकाल होत असल्याप्रकरणी अतिक्रमाणांचा मुद्दा उपस्तित केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email