“गज” चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीवर

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनाऱ्यालगत भागात अतिदक्षतेचा इशारा

“गज” चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून ते पश्चिम दिशेकडे सरकत आहे. आज सकाळी साडेपाच वाजता ते तामिळनाडूच्या मध्य भागात दाखल झाले. तत्पूर्वी ते तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवरील भागावरुन गेले. यावेळी ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

चक्रीवादळामुळे पुढील 24 तासात तामिळनाडूच्या उत्तर आणि दक्षिण भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर 48 तासात केरळच्या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email