खोणी आणि उत्तरशीव गावात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची विजय मिरवणूक
(श्रीराम कांदु)
शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा सर्वच ठिकाणी शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवले. पंचायत समिती खोणी गणातून शिवसेनेचे किरण ठोंबरे आणि जिल्हा परिषदसाठी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश कृष्णा पाटील यांना खोणी गटातून उभे होते. या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्यावर गावात विजय मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी शिवसेनेचा विजय असो अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी विजय उमेदवारी हा विकास कामांचा विजय असून शिवसेना जनतेच्या आणि जनता शिवसेनेच्या पाठीशी असल्याने दाखवून दिले आहे. गावात जी विकास कामे झाली आहे ती शिवसेनेने केली आहे जे जनतेला माहित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने शिवसेनेला साथ दिली याबद्दल जनतेचे आभार मानतो. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.