“खेळाडू हा लहानपणापासूनच घडला पाहिजे” दत्ता चव्हाण
(श्रीराम कांदु )
स्टार किड्स किंग्डमचा वार्षिक क्रीडामहोत्सव संपन्न
ठाणे : पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या “स्टार किड्स किंग्डम फाऊंडेशन” या संस्थेच्या दिघा या शाळेच्या वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते श्री दत्ता चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे, सामाजिक कार्यकर्ते संजय वर्धमाने व तसेच संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवळे व चेअरमन डॉ. गणेश जनार्दन घुगरे यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करून कार्यक्रम सुरु झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते श्री दत्ता चव्हाण सर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिघा गावात “खेळाडू हा लहानपणापासूनच घडला पाहिजे”. यासाठी स्टार किड्स किंग्डम या शाळेने चांगलेच प्रयत्न केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मुलांच्या क्रीडागुणांना. यासाठी स्टार किड्स किंग्डम या शाळेने चांगलेच प्रयत्न केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मुलांच्या क्रीडागुणांना नाविन्यपूर्ण रितीने वाव देण्याचे काम संस्था वेळोवेळी करत आली आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या खेळांचे, प्रात्यक्षिकांचे तसेच पाश्चात्य क्रीडा नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पालकांनी आणि इतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध स्तरांवरील मान्यवर, राजकीय व्यक्ती, याशिवाय शिक्षक आणि क्रीडा तज्ज्ञांनी या क्रीडा समारंभाला आवर्जून उपस्थिती दाखवली. सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतीक्षा पाटील, सौ. दीपाली डेरे, सौ. ज्योती हिरे, सौ. अर्चना धुले व संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी व मुलांनी हा महोत्सव दिमाखदार पद्धतीने संपन्न केला. शाळेच्या वाढत्या व्यापाचे व कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. संपर्क : ९८२१७८६५४३