खून करून पसार झालेल्या चार आरोपींना ठाणे खंडणी पथकाकडुन अटक
ठाणे :- पंढरपूर येथील संदीप पवार ह्याच्या खून करून पसार झालेल्या चार आरोपींना ठाणे खंडणी पथकाकडुन अटक करण्यात आली आहे.दिवसाढवळ्या दुपारी एक ते दीडच्या सुमारास संंदिप पवार याचा खून करुन आरोपी मोटर सायकलवरून मिरजला गेले तेथे आपल्या मोटरसायकल पार्क करून रेल्वे ने ठाण्याला आले तिथे त्यांच्या जवळचे पैसे संपत आल्यामुळे , ठाणे येथील पेट्रोल पंप लुटून पैसे घेऊन अहमदाबाद रोडने गुजरातला पळून जाण्याचा त्यांच्या प्लान होता ,तत्पूर्वी ठाणे खंडणी पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या , एकूण सहा आरोपी पैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी फरार आहेत.
Please follow and like us: