खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण थोडक्यात बचावला

नगर – अन्न,पाणी, निवारा आणि मोबाईल हे आता जणू समिकरणच तयार झालं आहे, पण हाच मोबाईल फोन तुमच्या जीवावरही बेतू शकतो.अकोल्यात तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन खिश्यात ठेवला होता, फोन आला म्हणून बाहेर काढला असता त्याचा स्फोट झाला. 

सुदैवाने तरुणाने मोबाईल खाली फेकल्यामुळे मोबाईल स्फोटातून थोडक्यात बचावला. परमेश्वर पवार नावाच्या तरुणाकडे एमआय कंपनीचा रेडमी हा मोबाईल होता. परमेश्वर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामासाठी घरुन निघाला होता. आॅफिसवरून फोन आल्यानंतर हातात फोन घेतल्यानंतर तो नेहमीपेक्षा घेतला.

त्याने मोबाईल नीट तपासून पाहिला असता तो फुगत असल्याचं जाणवलं. काही वेळातच अचानक त्यातून धुर येऊ लागला. त्याने मोबाईल फेकताच त्याचा स्फोट झाला. सुदैवानं परमेश्वरने वेळीच मोबाईल दूर फेकल्यानं जीवितहानी टळली.

जर मोबाईलचा खिश्यात स्फोट झाला असता तर माझ्या जीवाचं बरंवाईट झालं असतं असं परमेश्वरने सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.
त्यामुळे मोबाईल वापरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email