खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते तब्बल पावणे सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

उत्तरशिव येथील जि. प. शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
नागाव-उत्तरशिव पुलाचे लोकार्पण
खिडकाळी-उत्तरशिव पुलाचे भूमिपूजन

ठाणे – कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईच्या शहरी भागाला लागून असूनही विकासापासून कोसो दूर राहिलेल्या गावांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार वर्षांत कायापालट होत असून बुधवार, १६ मे रोजी खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते तब्बल पावणे सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. सांसद आदर्श गाव योजनेतील नागावमध्ये खा. डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेची नवी इमारत सीएसआर निधीतून उभी राहिली असून तिचे लोकार्पण बुधवारी झाले. तसेच, उत्तरशिव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे आणि नागाव-उत्तरशिव पुलाचे लोकार्पणही खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले.

खा. डॉ. शिंदे यांनी २०१४ साली खासदार झाल्यापासून ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांत कल्याण आणि अंबरनाथच्या ग्रामीण भागात तब्बल १०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. बारमाही भक्कम रस्ते, जलसिंचन, शाळा, पुल असे विकासाचे विविध प्रकल्प खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांतून राबवण्यात आले आहेत.

बुधवारीही पावणे सहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजने पार पडली. यात प्रामुख्याने नागाव ते उत्तरशीव पुल (४८ लाख), नागाव येथील नवनाथ पाटील ते गजानन भोईर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण (८ लाख), नागाव ते उत्तरशिव गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण (१५ लाख), खिडकाळी ते उत्तरशीव पुल (५८ लाख), उत्तरशिव ते खिडकाळी रस्त्याचे डांबरीकरण (१० लाख), उत्तरशीव येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण (१० लाख), उत्तरशिव-डायघर नाल्यावरील पुल (५ लाख), गोठेघर येथे स्टॉपपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (१० लाख), गोठेघर गावांतर्गत रस्ता (१० लाख), भंडार्ली येथे स्टॉप पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (१० लाख), भंडार्ली मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (६ लाख), भंडार्ली गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण (१५ लाख), खोत बंगला ते मोकाशी पाडा रस्ता (१५ लाख), मोकाशीपाडा ते मोकाशी गाव रस्ता (१५ लाख), दहिसर मोरी गावांतर्गत रस्ता (१५ लाख) या रस्त्यांचे भूमिपूजन खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी वडवली येथील धोकादायक पुलाची देखील पाहाणी केली. गेल्या चार वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीसाठी खा. डॉ. शिंदे पाठपुरावा करत आहेत. बाळे, उत्तरशीव, नारिवली, वडवली, कोळे, घेसर, वाकळण आदी सुमारे १५ गावांना जोडणारा हा पुल असल्यामुळे तो पडल्यास या सर्व गावांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी उपस्थित सा. बां. विभागाच्या अभियंत्यांना केली.खा. डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगर गॅस कंपनीच्या सीएसआर निधीमधून नागाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यासाठी कंपनीच्या वतीने ७६ लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला. उत्तरशिव येथील जि. प. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय निधीतून झाले. याही शाळेचे लोकार्पण आज करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रमेश म्हात्रे, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, महानगर गॅस लिमिटेडचे महाव्यवस्थापक अनिल कुट्टी, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील, विभागप्रमुख गणेश जेपाल, पंचायत समिती सदस्य भरत भोईर व किरण ठोंबरे, सा. बां. विभागाचे अभियंता हिरवे, जि. प. उपअभियंता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.