खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल ट्विटर वर अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल

( म विजय )

ठाणे दि. 21 -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अश्लिल भाषा वापरणाऱ्याच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत फिर्याद दिली असून वर्तकनगर पोलिसांनी वालचंद गिट्टे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
सुप्रियाताई सुळे यांच्या ट्विट अकाउंटवर झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात रोष व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविरोधात त्यांच्या ट्विटवर अश्लिल भाषेत ट्विट केल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुप्रियाताई यांच्या ट्विट अकाऊंटवर वालचंद गिट्टे नावाच्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल अश्लिल भाषेत टिपण्णी केली. दिनांक १५ आणि १९ नोव्हेंबर २०१७ रोजी हे लिखाण केले आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळे यांची सर्वत्र बदनामी झाली असल्याने कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३५४(ड) विनयभंग, ५०९, ५०० आणि ६७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.