खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शव वाहिका आणि स्वर्गरथाचे लोकार्पण
कल्याण – भिवंडी मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून , कल्याण पूर्व विधानसभा आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या आमदार निधीतून “ड”, जे ” आणि “आय “प्रभाग क्षेत्राकरिता प्रत्येकी आठ लाख निधीतून शव वाहिका आणि स्वर्गरथाचे लोकार्पण आ. गणपतशेठ गायकवाड व नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आणि भाजपा पदाधिकारी यांनी केले.या वेळीस तिन्ही प्रभागक्षेत्र आधिकरी सह शेकडो संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.