खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच निधन

एम् विजय

मुंबई -पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच आज दिल्ली येथे निधान झाले. ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्ली येथील लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांचे निधन झाले. खासदार अॅड.चिंतामण वनगा यांचा उल्लेख राजकारणातील संत व्यक्तिमत्व असा केला जायचा.वनगा तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले.त्यांची कार्य पद्धती सामाजिक कार्य करण्याची ओढ़ यातून एक लोकप्रिय नेता अशी ओळख निर्माण झाली होती.दरम्यान त्यांच्या निधानाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळासह पालघरच्या कानाकोपा-यात शोककळा पसरली.दरम्यान त्यांचा पार्थिव देह महाराष्ट्रात आणला जाणार असून येथेच त्यांच्यावर अन्त्यसंस्कार होणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email