खाद्य व पोषाहार विस्तार कार्यालय नागपूरव्दारे पोषण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालया अंतर्गत नवीन सचिवालय भवन, सिवील लाइन्स स्थित सामुदायिक खाद्य व पोषाहार विस्तार कार्यालय नागपूरव्दारे 1 ते 2 नोव्हेबंर दरम्यान पोषण आहार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन स्थानिक जरीपटका येथील विश्वरत्न बौद्ध विहार, इंदिरा नगर येथे करण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गात महिला व बालविकास विभाग, नागपूर परियोजनेच्या 30 अंगणवाङी सेविका व मदतणीस यानां पोषणावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी स्थानिक सामुग्रीचा वापर करुन किफायतशीरपणे तयार करण्यात आलेल्या पौषिक खाद्य-पदार्थांचे यांचे प्रदर्शनही लावण्यात आले व दृक- श्राव्य माध्यम व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्दारे प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे व पोषण शिक्षा संदर्भात साहित्याचे वाटपही करण्यात आले, अशी माहीती सामुदायिक खाद्य व पोषाहार विस्तार कार्यालयाचे प्रमुख व निदर्शन अधिकारी निरंजन सिंह चौधरी यांनी दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email