खड्डेमुक्त डोंबिवली हा नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार…
(श्रीराम कांदु)
मनसेच्या आंदोलनात सत्ताधरी आणि प्रशासनाला विचारला जाब
डोंबिवली दि.०७ – महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती राहुल दामले आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीत राहत असूनही डोंबिवली शहराची अशी अवस्था झाल्याने या शहराला कोणी वाली नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या शहरातील डांबरीकरण केलेल्या रस्त्याला पावसाळ्यात खड्डे पडल्याने निकृष्ट दर्ज्याचे काम झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्र निर्माण सेनेने याला पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. निलेश कानेटकर यांनी लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान करून मनसेच्या अनोख्या आंदोलनात खड्डेमुक्त डोंबिवली नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे सत्ताधरी आणि प्रशासनाला ठणकावून सांगितले.
या आंदोलनात मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा अध्यक्षा दीपिका पेडणेकर, उपजिल्हा सचिव निलेश भोसले, शहर अध्यक्षा मंदा पाटील, नगरसेविका सरोज भोईर ,विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्षा सागर जेधे, ग्रामीण पदाधिकारी राजेश म्हात्रे, शहर सचिव सुभाष कदम, गजेंद्र पवार, चेतन म्हात्रे, हरीश पाटील, मिलिंद गायकवाड, दीपक शिंदे, अरुण जांभळे, श्रीकांत वारंगे, यादीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकात पडलेल्या खड्डे दाखवत निलेश कानेटकर म्हणाले, स्वतंत्र मिळून ७० वर्ष पूर्ण झाली तरीही हे सरकार चांगले रस्ते देऊ शकले नाही. अश्या सरकारवर कोण विश्वास ठेवणार ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत म्हणाले, डोंबिवलीत आणि २७ गावातील रस्त्यावर खड्डे पडल्याने चांगले रस्ते देण्यास हे प्रशासन आई सत्ताधारी कमी पडले आहे. डोंबिवली शहराची अशी अवस्था पाहून हे शहर स्मार्टकधी बनणार ? लवकरात लवकर डोंबिवली शहर खड्डेमुक्त झाले नाही तर मनसे यापुढील आंदोलन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यालयात करतील असा इशारा दिला.