खड्डयाविरोधात भारिपचे पालिका मुख्यालयावर धरणे
कल्याण दि.२६ – गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत कल्याणातील खड्डेमय व उंचसखल रस्त्यामुळे झालेल्या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटना नंतर राजकीय पक्षांसह नागरिकांनी आंदोलने छेडत संताप व्यक्त करत तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तत्काळ खड्डे बुझवण्याचे काम हाती घेतले असल्याचा दावा करत सुमारे २ हजार खड्डे बुजवल्याचा दावा आलेला असला तरी अद्याप रस्त्यावरील खड्डे कायम असल्याचे दिसून येत आहे. याबाबत भारिप बहुजन महासंघ कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकरी व शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी वक्ते यांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळयात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे पडले या खड्यामुळे आतापर्यंत 5 जणांना आपण जीव गमवावा लागला. या 5 जणाच्या मृत्यूस महापालिका प्रशासन जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठी व पिडीता ना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे वक्ते यांनी सांगितले तसेच यावेळी वक्ते यांच्यासह पदाधिकर्यांनी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत मृता च्या कुटुंबीयाना आर्थिक मदत करण्यात यावी ,त्यांच्या वारसाना शासकीय सेवेत घ्यावे, निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करुन नागरिकांच्या मुत्युस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर महापालिका प्रशासनाने सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावे, निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्यात ठेकेदारा ना सहकार्य करणा-या आधिकार्याना महापालिका च्या सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.