खंडाळा येथील बेपत्ता युग मेश्रामचा नरबळी

चंद्रपूर – येथील ब्रम्हपुरी तालुक्यातील खंडाळा येथील बेपत्ता असलेल्या २ वर्षीय युग मेश्राम या चिमुकल्याचा नरबळी दिल्याचे उघडकीस आले आहे. युगच्या डोक्यावर ३ भोवरे असल्यामुळे त्याची गुप्तधनासाठी हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. चंद्रपुरात नरबळीचे प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या दोन मांत्रिकांनी अटक केली आहे. ईदच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी युग त्याच्या भावासोबत घराशेजारी खेळत असताना अचानक बेपत्ता झाला तो परत आलाच नाही. युगच्या आई बाबांनी त्याला शोधण्यासाठी सर्व परिसर पालथा घातला मात्र युगचा काही पत्ता लागला नाही. शेवटी रात्री उशीरा युग बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी युगला शोधण्यासाठी १० पथकं तयार केली. मात्र बुधवारी दुपारी युगचा मृतदेह गावात एका घराच्या मागे चाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडला.

हेही वाचा :- अंबाजोगाईत एसीबीची कारवाई; १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी चतुर्भूज

पोलिसांनी खंडाळा गावात कसुन तपास केला असता युगचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नसून शेजारी राहणाऱ्या दोन तांत्रिकांनीच युगचा नरबळी दिल्याचे उघड झाले आहे. प्रमोद बनकर आणि सुनील बनकर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मात्र हे दोन्ही आरोपी पोलीस तपासात नेहमी सहकार्य करत होते. तसेच किडणी चोरांनी युगचे अपहरण केले असावं अशा वेगवेगळ्या कहाण्या हे आरोपी गावकऱ्यांमघ्ये मुद्दाम पसरवत होते. मात्र पोलिसांनी या दोघांचा जबाब नोंदविला मात्र त्यामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आणि आपला हिसका दाखवल्यावर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. युगच्या डोक्यात केसाचे तीन भोवरे होते, अशा मुलांचा नरबळी दिल्यास गुप्तधनाची प्राप्ती होते अशी अंधश्रद्धा या हत्येच्या मुळाशी होती. त्यामुळे चॉकलेटच्या बहाण्याने या नराधमांनी युगला गुप्त ठिकाणी नेले आणि त्याच दिवशी त्याची पूजा करुत निर्दयपणे त्याचा बळी दिला. मात्र गावात पोलिसांनी ठाण मांडल्यामुळे युगच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ न मिळाल्याने त्यांनी मृतदेह आपल्याच घराच्या मागे असलेल्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवला. त्यांना युगचा मृतदेहाची १० किमी दूर असलेल्या नदीत विल्हेवाट लावायची होती. मात्र त्यांचा हा बेत फसला आणि पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email