खंडणीसाठी चक्क एका म्हशीचे अपहरण

खंडणीसाठी चक्क एका म्हशीचे अपहरण करण्यात आल्याची घटना उज्जैनच्या आक्याकोली गावात घडली असून म्हशीच्या फोटोसह तिच्या मालकाला व्हॉटस्अॅपवरून मेसेज पाठवून ८० हजाराची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असता या विचित्र गुन्ह्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी काय कारवाई करावी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

हेही वाचा :- देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 4 टक्के वाढ

उज्जैनच्या आक्याकोली गावात १३ ऑगस्टला सेवाराम यांची म्हैस हरवली होती. ते तिचा शोध घेत होते. तेव्हा १४ ऑगस्टला व्हॉटस्अॅपवर आलेल्या मेसेजने ते चक्रावून गेले. ‘तुझी म्हैस आमच्याकडे आहे. ती परत हवी असेल तर ८० हजार रुपये घेऊन ये’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. या मेसेजसोबत अपहरण करण्यात आलेल्या म्हशीचा फोटोही पाठवण्यात आला होता. सेवाराम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या विचित्र प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत. मात्र, यावर काय कारवाई करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे.

हेही वाचा :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे सेवाराम यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात व्हॉटस्अॅप पाठवणाऱ्याच्या माहितीसह त्याचा प्रोफाईल फोटोही पोलिसांना दिल्याचे सेवाराम यांनी सांगितले. म्हशीचे अपहरण केलेल्यांनी शनिवारी पुन्हा फोन करून खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर म्हैस दुसऱ्याला विकण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली आहे. म्हैस मुर्रा जातीची असून बाजारात तिची किंमत ८० हजार रुपये आहे. तिच्या किंमतीएवढी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस करावाई करत नसल्याने सेवाराम हतबल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.