खंडणीप्रकरणी तिघांना अटक

कल्याण- खंडणीसाठी धमकाविण्याच्या दोन वेगवेगळया गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन आरोपीचा आहे.लिब्रल दुकानाच्या मालकाला पाच लाख रूपयांच्या खंडणीसाठी दोघांकडून धमकाविले जात होते.तसेच एपीएमसी मार्केट परिसरात भाजीचा माल घेऊन येणा-या वाहनचालकांनाही धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळली जाते अशी तक्रारही पोलिस ठाण्यात दाखल होती. सदर दोन्ही गुन्हयांचा कसून तपास करून वरीष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र तायडे व त्यांच्या पथकाने तिघांना अटक केली.वाहनचालकांना धमकाविल्याच्या आरोपाखाली सनी सोळंकी आणि लिब्रल दुकानाच्या मालकाकड़े खंडणी मागितल्या प्रकरणी आवेश मोमीन व अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडी येथील  बालसुधारगृहात करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email