क्षुल्लक वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

( श्रीराम कांदु )
कल्याण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयिन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी बाप कलिम शेख ला अटक करत त्याच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे .आफताब आलम उर्फ बबलू  असे या मयत तरुणाचे नाव आहे .
  कल्याण पुर्वेकडील नेतीवली राम नगर  सूचक नाका परिसरात राहणारा आफताब आलम याचे याच परिसरात राहनार्य एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलांबरोबर भांडण झाले होते .ही बाब या अल्पवयीन मुलाचे वडील कलिम शेख यांना समजताच त्यांनी आफताबला जाब विचारण्यासाठी काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आफताब रामनगर परिसरात एक दुकानजवळ  ला गाठले .यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला .या वादामुळे संतापलेल्या कलिम शेख आणि त्यांचा 16 वर्षाचा मुलगा याने आफताब ला बेदम मारहाण केली .या मारहाणीत आफताब च्या गुप्तांगाला फटका लागल्याने आफताब चा मृत्य झाला .या प्रकर्णी कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाप कलिम शेख ला अटक करत त्याच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे .या घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email