क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न ,पिस्तुलही रोखले

डोंबिवली – रागाने बघितल्याने झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला सहा ते सात जाणानी बेदम मारहाण केली धक्कादायक बाब म्हणजे या तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न या टोळीने केला तसेच त्याच्यावर पिस्तुल रोखत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र जमलेल्या लोकांनी आरडा ओरड केल्याने या टोळीने तेथून पळ काढल्याने या तरुणाचा जीव वाचला या प्रकरणी सदर तरुणाने टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अर्जुन कदम ,लीच्या ,विपुल शेट्टी व त्यांच्या चार साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली गाव जयराम निवास येथे राहणारा राहुल पाटील यांचा  अर्जुन कदम ,लीच्या ,विपुल शेट्टी व त्यांच्या चार साथीदाराशी रागाने बघितल्याचा कारणा वरून वाद झाला होता . शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राहुल आपल्या इमारती मधील एका लग्नाच्या वरातीतून जवळच असलेया आपल्या मित्रासाठी पाणी आणण्यासाठी जात असताना अर्जुन कदम ,लीच्या ,विपुल शेट्टी व त्यांच्या चार साथीदारानी त्याला गाठले यामधील अर्जुनने त्याच्यावर तलवार उगारत त्याच्या साथीदाराना मारण्यास सांगितले मात्र राहुलने हा वार अडवल्याने तो वाचला यावेळी अर्जुनच्या साथीदारानी राहुलला  हॉकी स्टिक ,स्टंप पिस्तुलने मारहाण केली तर या मधिल एकाने राहुलवर पिस्तुल रोखली या वेळी जमलेल्या नागरिकांनी आरडा ओरड केल्याने या टोळीने तेथून पळ काढला .राहुलने या प्रकरणी अर्जुन कदम ,लीच्या ,विपुल शेट्टी व त्यांच्या चार साथीदाराविरोधात टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.