क्रेडिट कार्ड हॅक करत घातला हजारोंना गंडा व अन्य कल्याण गुन्हे वृत्त
( श्रीराम कांदु )
कल्यान : कल्यान पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरात राहणारी महिला मंगला चापेगडीकर यांच्या क्रेडिट कार्ड कुणी अज्ञात इसमाने इंटरनेट च्या माध्यमातून हॅक करत त्यांच्या कार्ड मधून 87 हजार 730 रुपये काढून घेतले .काल सदर बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलिस स्थनकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
———
विद्याथिनीचा विनयभंग
कल्यान : कल्याण पश्चिम परिसरात राहणारी सदर पीडित तरुणी काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कुल समोरून जात असताना एका दुचाकीवरून तीन तरुण आले यामध्ये पाठीमागे बसलेल्या तरुणाने तिला हटकले व तिच्याशी अश्लील वर्तन केले .याबाबत सदर पीडित मुलीच्या मैत्रिणीने या तरुणांना जाब विचारला असता त्यांनी तिच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली .या प्रकरणी सदर पीडित तरुणीने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
—-
कल्याण पूर्वेत घरफोडी
कल्यान : कल्याण पूर्वेकडील काटेमनवली परिसरात ,शंकर पावशे रोड शिव सह्याद्री कॉलनी मध्ये राहणारे काल दुपारी 3 वाजन्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेली होती.हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड मिळून तब्बल 66 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काही कालावधीने घरात परतल्या नंतर त्याना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी त्यानि कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .