क्रीडा संकुलमधील झाडाला बाटल्या : फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलमधील एका झाडाला दारूच्या बाटल्या टांगून ठेवल्याचे दृश्य दिसत आहे.हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. क्रीडासंकुल अर्थात खेळ,आरोग्य व खेळाडूवृत्ती आणि क्रिडागुणाना प्रोत्साहन देणारे स्थान अशा क्रीडासंकुलात घडलेल्या या प्रकाराबद्दल शहरात तीव्र नाराजिचे वातावरण पसरले आहे.डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलमधील एका झाडाला दारूच्या बाटल्या टांगून ठेवल्या आहेत. याचे काही जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईलवर फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले व हा प्रकार त्या जागरूक नागरिकांमुळे उजेडात आला.
(डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलमधील एका झाडाला दारूच्या बाटल्या टांगून ठेवल्या आहेत. याचे काही जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईलवर फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.)
Please follow and like us: